महाराष्ट्र ग्रामीण

Uddhav Thackeray : सहा खासदार सोडून जाणार असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray, Mumbai : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील केला होता. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?  

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बातमी पाहिली शिवसेनेचे सहा खासदार जाणार,  आता तुम्ही पुढे पुढे करून दाखवा तुमचं डोकं फोडू.. तुमच्या सर्व यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा आणि मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखवा…इन्कम टॅक्स, ईडी ,सीबीआय अशी भीती दाखवायची पैशाचे अमिष दाखवायचं आणि ही कसली भीती… ही कसली अवलाद. संपूर्ण देशाची वाट लावून टाकली…मला तुमच्याकडे बघून समाधान वाटते की कितीही कोणीही फोडाफोडी केली  तरी जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला कोणताही जरा सुद्धा पडलेला नाही…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आताच संजय राऊत यांच्या दोन-तीन गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो…पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधान यांचा  गंगा स्नानाचा…आणि त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालून आंघोळ केली असं म्हणतात.. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा म्हणायचे की रेनकोट घालून आंघोळ करतात…..गंगेत डुक्के मारताना आपला रुपया सुद्धा दुखतो आहे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असलो म्हणजे बरं होईल…शिवबंधन हातात असलं म्हणजे कोणीही कुठे जाणार नाही.. ज्यांची मनं मेली त्यांच्या हातात तलवार देऊन काय फायदा?  आज सुद्धा सुरज हा साधा शिवसैनिक आहे, त्याला काय दिलं असतं.. म्हटलं असतं तर भाजपमध्ये जाऊ शकला असता किंवा मिंधेकडे गेला असता…आपण त्याला काय दिलं?

दिल्लीचे हे तक्त राखी तो महाराष्ट्र माझा आताच्या दिल्लीतल्या लोकांना माहित नाही. अंबादास यांना विचारलं की तुम्ही आज बोलणार आहात का तर ते म्हणाले की नाही माझं कामच बोलत आहे…कालच रवींद्र माने आले होते…तेव्हा ते म्हणाले की मी मार खाण्यासाठी शिवसेनेत आलो… जो अन्याय होत होता तो सहन होत नव्हता म्हणून लढलं पाहिजे म्हणून मी आलो…काय मिळेल याची अपेक्षा नव्हती…काळोखात उडी मारली तरी काळोख टिकणार नाही कारण आता महाराष्ट्रावर वार करून मोक्ष मिळणार नाही..त्यांचं एकही ढोंग आहे, बहुमताचं ते त्यांनी राहुल गांधी यांनी फाडून टाकलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button