महाराष्ट्र ग्रामीण

‘या’ नेत्याला ‘मेरे घर राम आए हैं’ म्हटलं, अभिनेत्रीला मिळालं लोकसभेच तिकीट

लोकसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने उरले आहेत. समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीने 16 जणांना उमेदवारी दिली आहे. यात एक नाव खूप खास आहे. कारण कमी दिवसात या नावाने समाजवादी पार्टीमध्ये स्वत:ची ओळख बनवलीय. आम्ही बोलतोय काजल निषाद बद्दल. काजल निषादने टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती राजकारणात नशीब आजमवणार आहे.

भोजपुरी अभिनेत्री काजल निषादला गोरखपुरमधून समाजवादी पार्टीने तिकीट दिलय. काजल निषादवर सलग तिसऱ्यांदा समाजवादी पार्टीने विश्वास दाखवलाय. याआधी काजल निषादला विधानसभा आणि नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीने उमेदवारी दिलीय. काजल निषादच लग्न गोरखपुरच्या भौवापारमध्ये राहणाऱ्या संजय निषादसोबत झालय. संजय निषाद भोजपुरी चित्रपटांचा निर्माता आहे.

‘मेरे घर राम आए हैं’ असं तिने म्हटलेलं

समाजवादी पार्टीत प्रवेश करण्याआधी काजल निषाद 2012 साली काँग्रेसमध्ये सक्रीय राजकारण करत होती. पण 2021 साली काँग्रेसची साथ सोडून तिने समाजवादी पार्टीच सदस्यत्व स्वीकारलं. अखिलेश यादव जेव्हा कधी गोरखपुर दौऱ्यावर गेले, तेव्हा त्यांनी काजल निषादच्या घरी मुक्काम केला. ‘मेरे घर राम आए हैं’ असं काजल निषादने सोशल मीडियावर म्हटलं होतं. यानंतर काजल निषादला पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळेल, असं बोलल जात होतं.

निवडणूक हरुनही दाखवला विश्वास

काजल निषादने भोजपुरी चित्रपटात बरच काम केलय. तिने मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटात महत्त्वाचा रोल साकारला आहे. काजलने प्रसिद्ध मालिका लापतागंजमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका केलीय. एक्टिंगसोबत ती राजकारणात सुद्धा नेहमी सक्रीय होती. काजल एकदा काँग्रेसच्या आणि एकदा समाजवादी पार्टीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक हरली आहे. मात्र, तरीही समाजवादी पार्टीने तिच्यावर विश्वास दाखवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button